1
00:00:12,763 --> 00:00:13,933
कॉफी बार

2
00:00:20,730 --> 00:00:21,810
आधी महिला.

3
00:00:22,398 --> 00:00:23,898
धन्यवाद.

4
00:00:27,987 --> 00:00:32,117
तर. मला एक मोठा कॅफेमेसिटो,
सोया दुधासोबत, उकळत.

5
00:00:32,324 --> 00:00:34,244
शिवाय, एक गरम चहा लॅटे आणि--

6
00:00:34,410 --> 00:00:35,410
तू काय करतेय?

7
00:00:35,619 --> 00:00:38,289
-मागणी नोंदवतेय.
-हा, ते दिसतय, पण इथे आधी मी आलोय.

8
00:00:38,456 --> 00:00:41,206
आणि मला केवळ एक काळी कॉफी हवी.
एक काळी कॉफी.

9
00:00:41,375 --> 00:00:43,085
-तुच म्हटलास, "आधी महिला"?
-नाव?

10
00:00:43,294 --> 00:00:45,344
हो, त्या तिथे, इथे नाही.

11
00:00:45,546 --> 00:00:46,876
का? त्यात फरक काय आहे?

12
00:00:47,089 --> 00:00:48,089
महोदय, नाव?

13
00:00:48,257 --> 00:00:51,087
जरा थांब, स्पॉर्टी. फरक हा आहे, त्या तिथे...

14
00:00:51,260 --> 00:00:55,010
...मी स्त्रीदाक्षिण्य दाखवलं. तू मात्रस्वार्थी,
अविचारी आणि उद्धट आहेस.

15
00:00:55,181 --> 00:00:57,351
तू जगात इतरांसोबत राहतेस, कळलं?

16
00:00:57,516 --> 00:00:59,226
फोन मधून डोकं काढ, तुला ते दिसेल.

17
00:00:59,393 --> 00:01:02,613
माझा फोन? मला कार्यालयासाठी
कॉफीची मागणी नोंदवायचीये.

18
00:01:02,772 --> 00:01:05,442
त्यात निदान शंभरावर तरी पेय असतील.

19
00:01:05,608 --> 00:01:07,818
तू तुझ्या सगळ्या कार्यालयासाठी कॉफी
का घेते आहेस?

20
00:01:07,985 --> 00:01:09,525
कधी बेटी फ्रीडेनच नाव ऐकलय?

21
00:01:09,695 --> 00:01:10,985
-नाही, मी--
-ग्लोरीआ स्टीनेम?

22
00:01:11,155 --> 00:01:12,485
-काही अंदाज नाही बा.
-खरच?

23
00:01:12,656 --> 00:01:14,026
नाही. मुळीच नाही.

24
00:01:14,241 --> 00:01:17,791
-कदाचित तुझ औषध सुरु असाव.
-माझं कॉफी नावाच औषध सुरु आहे.

25
00:01:17,953 --> 00:01:21,583
मग. वाट पाहतो तू त्या शतमुर्खांची
मागणी नोंदवण्याची.

26
00:01:21,749 --> 00:01:23,419
-तू गाढव आहेस.
-मी गाढव आहे?

27
00:01:23,584 --> 00:01:25,424
-हो. हो, गाढव आहे.
-मी गाढव आहे?

28
00:01:25,586 --> 00:01:26,586
कारण खरं सांगु.

29
00:01:26,754 --> 00:01:29,554
जर मी तरूण नसते, लक्षात घे,
टंच नसते...

30
00:01:29,715 --> 00:01:32,425
...तू माझ्यासाठी दरवाजा पकडला नसता.
तू माझी छेड काढत होतास.

31
00:01:32,593 --> 00:01:35,433
आणि मग, जेव्हा तुझ्या लक्षात आलं
मी भाव देत नाहीये, तुझा ताबा सुटला.

32
00:01:35,596 --> 00:01:38,596
आणि मग, तुझं सगळ
स्त्रीदाक्षीण्य फुर्रर झालं.

33
00:01:39,433 --> 00:01:40,563
तर तू असं करतेस?

34
00:01:40,726 --> 00:01:43,686
तू तुझा सगळा स्वकेन्द्री स्वभाव एकत्र
करते, आणि माझ्यावर उलटवतेस?

35
00:01:43,854 --> 00:01:46,114
-आता, मी गाढव आहे--?
-गाढव?

36
00:01:46,315 --> 00:01:47,565
"गाढवा" करिता कॉफी.

37
00:01:48,359 --> 00:01:49,989
हा , तोच मी.

38
00:01:51,111 --> 00:01:52,111
हां ही.

39
00:02:04,708 --> 00:02:06,458
इमॅक्युलेट हार्ट सामुदायिक केंद्र

40
00:02:22,518 --> 00:02:24,938
तर, मला आज इथे काही
नवे चेहरे दिसताहेत.

41
00:02:25,104 --> 00:02:27,864
मी सॅम लाउडरमिल्क. मी चार वर्षांपासून
दारूला स्पर्श केलेला नाही...

42
00:02:28,023 --> 00:02:32,533
...आणि मी अत्यंत उत्साहित आहे तुमची
दारू सोडवायला मदत करायला.

43
00:02:36,574 --> 00:02:39,664
तर तुमच्यापैकी कोण आधी बोलेल?

44
00:02:39,869 --> 00:02:41,329
पिऊ नका. पिऊ नका.

45
00:02:41,787 --> 00:02:42,867
पिऊ नका.

46
00:02:43,038 --> 00:02:45,498
खरतर, माझं मेथ घेण्याच
व्यसन सुटतय.

47
00:02:45,666 --> 00:02:48,626
तरी चांगला सल्ला. आंघोळ कर.
हे, इकडे ये. सिसको.

48
00:02:50,004 --> 00:02:51,764
तू काहीच का बोलत नाहीस?

49
00:02:51,922 --> 00:02:53,922
-कारण सगळं ठीक सुरु आहे.
-ठीक.

50
00:02:54,091 --> 00:02:56,971
तर--? तर किती दिवसांपासून तू
पिण्याला स्पर्श केला नाहीस?

51
00:02:57,595 --> 00:02:59,175
-मी-
-हा, नाही. तू माझ्याशी खोटं बोलतोय.

52
00:02:59,346 --> 00:03:01,846
कळल? सुटली की चाचरण राहत नाही.

53
00:03:02,016 --> 00:03:05,016
जर तू पित नसशील तर, तुला माहिती
असायला हवं तू कधीपासुन पित नाहीस.

54
00:03:05,185 --> 00:03:06,975
हा, बरोबर. मी काही बिअर पिल्या.

55
00:03:07,605 --> 00:03:08,605
कुठली बिअर?

56
00:03:08,814 --> 00:03:10,484
कुअर्स लाईट.

57
00:03:11,567 --> 00:03:13,987
तो प्रकार पाण्यासारखा आहे.
त्याला-त्याला मोजायचं नसतं.

58
00:03:14,153 --> 00:03:16,953
-खरच?
-नाही. तिही दारूच आहे, पियक्कड.

59
00:03:17,114 --> 00:03:18,534
काही काय.

60
00:03:18,699 --> 00:03:19,949
मी खरच प्रयत्न करतोय मित्रा. मी--

61
00:03:20,117 --> 00:03:22,617
हां, तू अजून जोरकस प्रयत्न
करायला हवेत.

62
00:03:23,162 --> 00:03:24,372
ऐक...

63
00:03:25,205 --> 00:03:27,745
...आयुष्य म्हणजे आई घालणे आहे,
बरोबर?

64
00:03:27,917 --> 00:03:30,707
आणि मग, आपण केलेला गोंधळ
निस्तरण आहे.

65
00:03:30,878 --> 00:03:33,298
त्यामुळे आयुष्यातला गोंधळ कमी होतो.

66
00:03:33,464 --> 00:03:34,674
मी खोटं बोलत नाहीये.

67
00:03:35,841 --> 00:03:37,221
धन्यवाद.

68
00:03:37,551 --> 00:03:38,931
मी चांगल करण्याचा प्रयत्न करीन.

69
00:03:39,219 --> 00:03:41,259
हा, अजून त्याच वाईट करू नकोस.

70
00:03:42,681 --> 00:03:45,681
श्री. लाउडरमिल्क, मला तुमच्याशी जरा
खाजगी बोलायचंय?

71
00:03:45,893 --> 00:03:47,563
हे खाजगी नाहीये?

72
00:03:49,355 --> 00:03:51,935
तर, मला वाटत तुम्हाला आश्चर्य
वाटायला नको...

73
00:03:52,107 --> 00:03:56,027
...मला एक निनावी तक्रार मिळाली
आहे तुम्ही बैठका कशा घेता याबद्दल.

74
00:03:56,195 --> 00:03:57,485
कोण?

75
00:03:57,655 --> 00:03:58,815
नाही, मला नाव हवंय.

76
00:03:58,989 --> 00:04:01,279
मी तुम्हाला नाव देऊ शकत नाही. मी
तुम्हाला आताच सांगितलय.

77
00:04:01,450 --> 00:04:03,080
तक्रारी निनावी असतात.

78
00:04:03,243 --> 00:04:05,373
ही ती म्हातारी असणार आहे, होना?

79
00:04:08,457 --> 00:04:10,497
ऐक, लाऊडरमिल्क, स्विकार कर.

80
00:04:10,668 --> 00:04:12,288
तू मनमिळाऊ किंवा कलाने
घेणारा नाहीये.

81
00:04:12,461 --> 00:04:15,841
तू कडक आणि टोकदार आणि अस्वस्थ
करणारा आहेस.

82
00:04:16,006 --> 00:04:18,876
तू आईकीया खुर्ची सारखा आहेस जो
व्यसनमुक्तीचा कार्यक्रम चालवतोय.

83
00:04:19,343 --> 00:04:20,343
ते जे काही का असेना...

84
00:04:20,511 --> 00:04:23,811
...मला वाटत तुझी संस्था जे काम
करते त्याने अनेकांचा फायदा होतो.

85
00:04:23,973 --> 00:04:24,973
आणि केवळ त्या कारणासाठी...

86
00:04:25,140 --> 00:04:28,060
...मला तुझ्या बैठका रद्द करायला
आवडणार नाही...

87
00:04:28,227 --> 00:04:31,307
...कारण त्याचा निमंत्रक सभ्य नाहीये.

88
00:04:31,480 --> 00:04:34,020
तर, मग, मला--?

89
00:04:34,274 --> 00:04:36,574
मला कुठलं बक्षिस वगैरे मिळणार
आहे का?

90
00:04:37,069 --> 00:04:38,699
माझी एक मदत करशील.

91
00:04:38,862 --> 00:04:41,492
श्रीमती विल्किस आपल्या चर्चची
महत्वपुर्ण सदस्य आहे.

92
00:04:41,657 --> 00:04:44,077
सध्या, आपल्या पोरीबाबत तिला
काही अडचण आहे.

93
00:04:44,618 --> 00:04:45,618
देवा, मला मदत करो.

94
00:04:45,786 --> 00:04:49,206
मला वाटत तुझ्यासारख्या मदतीची तिला
खरी आवश्यकता आहे.

95
00:04:49,373 --> 00:04:52,503
जे लोकं मार्ग भरकटले असतात त्यांना
वठणीवर आणण्याची तुझी हातोटी आहे.

96
00:04:52,668 --> 00:04:56,628
हो, पण मला स्त्रीया नीट हाताळता
येत नाहीत...

97
00:04:56,797 --> 00:05:00,337
...तुम्हाला तिने घरात तोडफोड करून
घर सोडायची इच्छा असेल तर.

98
00:05:02,011 --> 00:05:03,641
माझी मुलगी, क्लेअर...

99
00:05:03,804 --> 00:05:05,684
...ती चांगली मुलगी आहे.

100
00:05:05,889 --> 00:05:07,349
चांगली मुलगी होती.

101
00:05:07,558 --> 00:05:08,638
तिच्यात काही बदल होताहेत का?

102
00:05:09,435 --> 00:05:11,845
नाही. ती अजूनही मुलगी आहे.

103
00:05:12,021 --> 00:05:14,651
पण आता ती वाईट मुलगी झालीये.

104
00:05:14,815 --> 00:05:18,525
माझ्या नवऱ्याच्या निधना नंतर,
ती जरा जास्तच हाताबाहेर गेली.

105
00:05:18,694 --> 00:05:22,784
मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला
तिला त्या अफूच्या शाळेत टाकण्यासाठी.

106
00:05:22,948 --> 00:05:25,408
-पुनर्वास.
-पण ती माझं ऐकायला तयार नाही.

107
00:05:26,035 --> 00:05:28,325
ठीक, म्हणजे, मला नाही माहिती,
तिला बैठकीला पाठवा.

108
00:05:28,495 --> 00:05:30,245
-मी-मी तिच्याशी बोलून पाहतो.
-नाही.

109
00:05:30,748 --> 00:05:33,038
ती येणार नाही. तुम्हालाच तिच्याकडे
जावं लागेल.

110
00:05:33,208 --> 00:05:35,918
अच्छा, अजुन एक.
मी कोणाच्या घरी जात नाही.

111
00:05:36,086 --> 00:05:37,206
माझ्यासाठी.

112
00:05:37,379 --> 00:05:39,169
पाद्री माईकेलने तुमची फार मोठी
सिफारिश केली आहे.

113
00:05:39,339 --> 00:05:40,549
ठिक...

114
00:05:40,716 --> 00:05:44,136
...मी अस म्हणणार नाही "मोठी."
ऐक, लाऊडरमिल्क...

115
00:05:45,137 --> 00:05:48,557
...तू जाऊन क्लेअरशी बोल, आणि मी
इथल्या बैठका तहकुब करणार नाही...

116
00:05:48,724 --> 00:05:52,814
...किंवा शेरा देणार नाही तू याजागेत
प्रवेश करण्यायोग्य नाहीस--

117
00:05:52,978 --> 00:05:54,808
ठिक आहे, ठिक, ठिक, ठिक.
मी हे करेन.

118
00:05:54,980 --> 00:05:58,400
हे नाजुक फुल मला निश्चितपणे
कुठं सापडेल?

119
00:06:28,847 --> 00:06:29,967
तू साल्या आहेस कोण?

120
00:06:30,891 --> 00:06:33,981
हां, ही बोलली डीस्नीची राजकुमारी.

121
00:06:34,853 --> 00:06:37,983
पुन्हा, साल्या तू आहे तरी कोण?

122
00:06:38,148 --> 00:06:41,738
मी सैम लाऊडरमिल्क. तुझ्या आईने
सांगितलं तुला मदतीची गरज आहे...

123
00:06:41,902 --> 00:06:44,532
-...मला वाटत तिने मांडवली केली.
-माझी आई भोकाची आहे.

124
00:06:47,950 --> 00:06:49,160
हा, कदाचित ती असेल ही.

125
00:06:49,326 --> 00:06:52,036
तिला माझ्याविषयी काही माहिती नाही
किंवा मला आयुष्यात काय हवाय.

126
00:06:52,204 --> 00:06:54,624
त्यामुळे गाढवा आला तसा निघ.

127
00:06:55,415 --> 00:06:57,415
मला केवळ तुझा थोडा वेळ हवा आहे.

128
00:06:57,584 --> 00:07:00,594
मला कळतय आपल्यात बराच संभोग...

129
00:07:00,796 --> 00:07:03,626
-...होऊ शकतो, पण ते शक्य नाहीये.
-किळसवाण, तू ७०चा आहेस.

130
00:07:03,799 --> 00:07:06,639
मी किळसवाणा?
तू काय १४ पौंडाची आहेस.

131
00:07:06,802 --> 00:07:08,642
-साल्या निघ.
-हां.

132
00:07:08,804 --> 00:07:11,524
विनोदासाठी अतिशयोक्ती चा वापर.
नेहमीच चांगला नसतो, होना?

133
00:07:13,475 --> 00:07:14,845
तू मला आत का येऊ देत नाहीस?

134
00:07:15,018 --> 00:07:18,478
ठिक, ये आत.

135
00:07:31,076 --> 00:07:33,536
हा माझा प्रियकर, वॅट.

136
00:07:34,204 --> 00:07:35,254
हो? गेला उडत.

137
00:07:36,957 --> 00:07:39,417
तुला कळतय तू मला सांगायला हवं
जर तू मला शूट करत असशील?

138
00:07:39,585 --> 00:07:41,335
मी तुला कशाला शूट करू?

139
00:07:41,503 --> 00:07:44,973
म्हणजे, मी विचार केलेला होर्डस् ची
चमू इथे कुठून तरी येऊन पोहचणार.

140
00:07:47,467 --> 00:07:48,587
तर, काय सुरुये?

141
00:07:48,760 --> 00:07:52,680
तू जगावर उठलीस कारण तुझे
वडील गेलेत, की--?

142
00:07:52,890 --> 00:07:54,140
मी-- काय सुरु काय आहे?

143
00:07:54,600 --> 00:07:57,020
काही सुरु नाहीये.

144
00:07:57,186 --> 00:08:00,016
मी माझं आयुष्य जगतेय जसं मला
जगायचं आहे.

145
00:08:01,815 --> 00:08:03,315
ठिक.

146
00:08:03,817 --> 00:08:04,987
ठिक. भेटू मग.

147
00:08:05,736 --> 00:08:07,486
-काय?
-काय, काय?

148
00:08:07,654 --> 00:08:09,204
इतकच?

149
00:08:09,406 --> 00:08:11,156
हो, इतकच.

150
00:08:11,325 --> 00:08:14,445
तुझ्याकडून ही अपेक्षा केलीये, तू जास्त
प्रयत्न करशील किंवा असच?

151
00:08:15,245 --> 00:08:17,245
मला हे तुला स्पष्ट करू देत.

152
00:08:17,414 --> 00:08:19,884
मी तुला ओळखत नाही. मला तुझी
पर्वा ही नाहीये.

153
00:08:20,042 --> 00:08:22,752
तुला दारू पिऊन आणि व्यसन करून
स्वत:ला संपवायचं आहे? उत्तम.

154
00:08:22,920 --> 00:08:25,380
-तू उत्तम करते आहेस.
-तर तू इथे का येत नाहीस?

155
00:08:25,547 --> 00:08:29,547
मला जाणून घ्यायचंय तू जे काही दाखवते
त्याच्या अर्धी तरी आहेस का...

156
00:08:29,718 --> 00:08:31,798
-...जस तुझ्या आईने म्हटलं आहे.
-साल्या, निघ इथून.

157
00:08:31,970 --> 00:08:35,140
इथे. हा माझा क्रमांक आहे.
तुला मदत हवीये, फोन कर.

158
00:08:35,307 --> 00:08:36,927
तुला बैठकीला यायचंय, उत्तम.

159
00:08:37,100 --> 00:08:40,150
नाही याचय, गेली उडत.

160
00:08:40,729 --> 00:08:42,559
साल्या तू आधी इथून निघ.

161
00:08:43,190 --> 00:08:46,320
हो, निघतोय-- निघतोय. यासाठी नाही
की मी तुला घाबरलोय...

162
00:08:46,485 --> 00:08:49,945
...पण यासाठी की इथे दोन
कचराकुंड्या उघड्या पडल्यात.

163
00:09:02,501 --> 00:09:03,961
हां मी आलोच.

164
00:09:05,879 --> 00:09:08,839
हे. महान पिढी, चला, घाई करा.

165
00:09:09,007 --> 00:09:11,677
-थांबु नका.
-मी प्रयत्न करतोय.

166
00:09:12,219 --> 00:09:16,349
हा, असा विचार कर मी आईक आहे, आणि
ती नॉर्मंडी आहे आणि भेद कर त्याचा.

167
00:09:17,724 --> 00:09:19,484
अरे, देवा रे.

168
00:09:20,602 --> 00:09:23,692
अरे, सांभाळून. हा फेंडर किंग्जमन तुझ्या
सहा महिन्याच्या भाड्याइतका आहे.

169
00:09:23,855 --> 00:09:25,355
म्हणजे कचरा असणार आहे...

170
00:09:25,524 --> 00:09:28,364
...कारण मी अजून एका सोबत
गल्ली दिसणाऱ्या खोलीत राहतो.

171
00:09:32,197 --> 00:09:33,487
हाय.

172
00:09:33,657 --> 00:09:35,447
हे.

173
00:09:37,202 --> 00:09:41,622
हे, हे थोड सांगायला कठीण आहे, पण मला
वाटत तुझ्या पाठीला खुर्ची चिटकली आहे.

174
00:09:41,790 --> 00:09:44,080
-काय? कुठे?
-दुसऱ्या-- दुसऱ्या खांद्यावर.

175
00:09:44,668 --> 00:09:48,298
हा, ठेव-- नाही, नाही. फार दूर. मागे.

176
00:09:48,672 --> 00:09:50,262
हां तिथेच.

177
00:09:50,424 --> 00:09:53,974
कदाचित उपाहारगृहात चिटकली असेल,
मागच्या काही दिवसात.

178
00:09:54,136 --> 00:09:55,796
काहीही. पुन्हा नको.

179
00:09:56,847 --> 00:09:58,137
मी अॅलीसन.

180
00:09:58,307 --> 00:10:00,347
मी नुकतीच २सी मध्ये आलीये.

181
00:10:00,559 --> 00:10:02,889
सॅम, २बी...

182
00:10:03,061 --> 00:10:04,941
...किंवा करू नये.

183
00:10:05,480 --> 00:10:07,020
ही माझी खोली आहे.

184
00:10:08,442 --> 00:10:11,322
ती खरतर २बी आहे, म्हणजे
कुठलाच गोंधळ नको.

185
00:10:12,904 --> 00:10:17,084
अरे, श्री. एलीस, मी तुम्हाला फोन करणार
होते माझे गिटार चे वर्ग सुरु करण्यासाठी.

186
00:10:17,242 --> 00:10:19,042
-तू ठीक आहेस?
-हो, अगदी.

187
00:10:19,202 --> 00:10:21,042
मी महान पिढीचा आहे. बरोबर?

188
00:10:21,204 --> 00:10:24,214
ओह, महोदय, मी तुम्हाला काही मदत
करू का? हे जरा जड वाटतय.

189
00:10:24,374 --> 00:10:26,424
तुला खात्री आहे तू मला पुन्हा खाली
ढकलून देणार नाहीस?

190
00:10:26,585 --> 00:10:30,165
-या इसमाने पायऱ्यावर धक्का दिला.
-नाही, मी बाजूने धावत गेलो.

191
00:10:30,339 --> 00:10:32,549
पुसटसा स्पर्श झाला. मी धावत गेलो.

192
00:10:32,716 --> 00:10:34,756
कोण म्हाताऱ्या माणसाच्या बाजूने धावत
जातो, आणि त्याला धक्का देतो?

193
00:10:34,926 --> 00:10:37,676
मी त्याला धक्का दिला नाही. मी
त्याच्यावर थोडा आदळलो असेन, इतकच?

194
00:10:37,846 --> 00:10:39,596
पण तेच. याने--

195
00:10:39,765 --> 00:10:41,885
ऐक, त्यांच वय झालय.

196
00:10:42,059 --> 00:10:43,639
ते फुगवून सांगतात.

197
00:10:44,353 --> 00:10:47,233
हा, मला वाटत "करणार नाही."

198
00:10:52,694 --> 00:10:54,494
डुक्कर.

199
00:11:00,035 --> 00:11:04,365
तर मग, तो मला डुक्कर म्हणाला, आणि
तिने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला.

200
00:11:04,539 --> 00:11:07,629
हा, मला म्हणायचंय "डुक्कर" ठीक आहे.

201
00:11:07,793 --> 00:11:10,383
हो, पण तिला ते अजुनपर्यन्त माहिती
नाहीये, बरोबर?

202
00:11:10,545 --> 00:11:13,415
-मी तिला भुलवण्याचा प्रयत्न करत होतो.
-तुला सांगु, मला एक प्रश्न पडलाय.

203
00:11:13,590 --> 00:11:15,930
तू रस्त्यात येणाऱ्या म्हाताऱ्याला
ढकलत का होतास?

204
00:11:16,093 --> 00:11:17,263
कारण मी घाईत होतो.

205
00:11:18,095 --> 00:11:19,715
कशासाठी? तुला कुठे जायचं नव्हत.

206
00:11:20,263 --> 00:11:22,563
हां, कदाचित मला कुठे ही वेगाने
जायचं नव्हत.

207
00:11:24,393 --> 00:11:27,943
तर तू तिच्यासोबत जमवुन घेण्याचा
प्रयत्न करणार आहेस का?

208
00:11:28,313 --> 00:11:31,323
-मला नाही माहिती. मुद्दा काय आहे?
-मुद्दा काय आहे?

209
00:11:31,483 --> 00:11:35,823
तर, ही पहिली स्त्री आहे, जिच्यासोबत
तुझ काहीतरी नात अनेक वर्षात जमतय.

210
00:11:36,029 --> 00:11:39,569
हो. पण तिला माझी खांदयावर खुर्चीवाली
गोष्ट नाही आवडली गड्या...

211
00:11:39,741 --> 00:11:40,781
...जी मी पुर्वतयारीशिवाय बोललो.

212
00:11:41,910 --> 00:11:44,410
मजेदार होतं. "असं वाटतय खुर्ची
तुला चीटकलीये."

213
00:11:44,913 --> 00:11:47,623
-हो.
-आता तू तिला समजावून सांग.

214
00:11:47,833 --> 00:11:50,633
दाखवून दे तू एक विचारी,
हळवा इसम आहेस.

215
00:11:50,794 --> 00:11:51,804
म्हणजे तिला फसवू म्हणतो?

216
00:11:52,546 --> 00:11:53,706
हो.

217
00:11:54,714 --> 00:11:56,134
कसं काय?

218
00:12:03,473 --> 00:12:04,773
नाही, नाही, नाही.

219
00:12:04,933 --> 00:12:06,893
लाऊडरमिल्क तुला दुकान येण्यासाठी
मनाई करण्यात आलीये.

220
00:12:07,060 --> 00:12:10,650
-तुझ्या तिरस्काराचा मला कंटाळा आलाय.
-शांत हो, मी तह करायला आलोय.

221
00:12:11,231 --> 00:12:13,731
मला यावर वाद घालायचा नाहीये की
निर्वाण कसं अस्तित्वात नाहीये...

222
00:12:13,900 --> 00:12:15,990
...जोपर्यंत आपण ६०च्या दशकातले
बबलगम हिट्स ऐकत नाही.

223
00:12:16,153 --> 00:12:18,703
मित्रा, हे सुलभीकरण झालं.

224
00:12:19,906 --> 00:12:22,616
"सुलभीकरण"? आता आपण शब्द
ही बनवायला लागलोत?

225
00:12:22,784 --> 00:12:24,874
केवळ कोबेन नी, एका मुलाखतीत म्हटलय...

226
00:12:25,036 --> 00:12:28,246
...की ते १९१० च्या फ्रुटगम कंपनीच्या
"यमी यमी यमी" ची आवृत्ती होती.

227
00:12:28,415 --> 00:12:31,455
हो, हे, हे. ठीक आहे, ठीक आहे.
अरे कप्तान पॉम्पस, शांत हो.

228
00:12:31,626 --> 00:12:35,046
तुला काय बोलायचंय ते ठरव, आपण यावर
बोलू. आम्ही सध्या विशेष काम करतोय.

229
00:12:35,213 --> 00:12:38,973
-ठिक. तुम्ही काय शोधताय?
-लाऊडरमिल्क ने एका वृध्दाला धक्का दिला...

230
00:12:39,134 --> 00:12:42,934
...आणि आमची नवी टंच शेजारीण उभी
होती. तो तिच्याशी तह करतोय.

231
00:12:43,096 --> 00:12:44,216
देवा, मित्रा.

232
00:12:44,514 --> 00:12:45,894
तू फार वाईट आहेस, मित्रा.

233
00:12:46,057 --> 00:12:47,807
ओह, खरच? मी वाईट आहे?

234
00:12:47,976 --> 00:12:50,266
मी हिटलरपेक्षा वाईट आहे?
मी सोल झॅनपेक्षा वाईट आहे?

235
00:12:50,437 --> 00:12:51,477
मी पॉल पॉटपेक्षा वाईट आहे?

236
00:12:51,646 --> 00:12:54,316
हे, हे जरा विचित्रच नाही का, त्या इसमाच्या
नावातच "पॉट" आहे...

237
00:12:54,483 --> 00:12:57,363
...तो पूर्णपणे फसवा निघाला?

238
00:12:58,778 --> 00:13:01,908
-तू याची वाट पाहात होता, बरोबर ना?
-बऱ्याच वेळेपासून.

239
00:13:02,073 --> 00:13:04,703
-फार दिवसांपासून संधी शोधत होतो.
-हा सॉल झॉनट्स कोण बुआ आहे?

240
00:13:04,868 --> 00:13:06,448
तुला सॉल झॉनट्स माहिती नाही?

241
00:13:06,620 --> 00:13:09,620
गाढव निर्माता. तो क्रीडन्सला त्यांच
संगीत वाजवतात म्हणून बदलणार होता.

242
00:13:09,789 --> 00:13:13,129
त्या मुर्खामुळे आपल्याला अनेक वर्षे
"पुट मी इन, कोच" ऐकाव लागल.

243
00:13:13,585 --> 00:13:14,835
मला "सेन्ट्रीफील्ड" आवडतात.

244
00:13:15,045 --> 00:13:16,955
हा, कारण तू मूर्ख आहे.

245
00:13:17,797 --> 00:13:21,217
ऐक, मित्रा, मला तुला सांगायला हवं. तुझा
प्रायोजक आणि तुझा एकमेव मित्र म्हणून...

246
00:13:21,384 --> 00:13:23,514
...तू लोकांना सहज आवडू देत नाहीस.

247
00:13:23,678 --> 00:13:26,218
काही काय बोलतोस? मी लोकांचा आहे.

248
00:13:26,389 --> 00:13:29,229
जो पर्यंत लोकं मुर्खा सारखे वागत नाहीत,
जे ते बहुतेकदा वागतात.

249
00:13:29,392 --> 00:13:31,022
बहुतेकदा वागतात.

250
00:13:39,528 --> 00:13:40,528
"आंद्रे सेगोविआ."

251
00:13:40,695 --> 00:13:44,655
तो जगातला जबरदस्त शास्त्रीय गिटारवादक
आहे, काही तरी शृंगारीक वाजवतोय.

252
00:13:44,824 --> 00:13:46,874
-तिला, हा प्रकार आवडेल, बरोबर?
-हो. हो.

253
00:13:47,035 --> 00:13:48,575
दिसतय तू लक्ष देतोय.

254
00:13:48,745 --> 00:13:52,955
यात बिईग ओब्स्क्युअर च जादा गाण
पण आहे, जे त्या अहमन्य बाईला आवडेल.

255
00:13:53,166 --> 00:13:56,036
-तुला वाटत ती अहमन्य आहे?
-मला नाही माहिती. आशा करुया.

256
00:13:56,211 --> 00:13:58,631
-उत्तम, चल इथून बाहेर पडू या.
-ठीक.

257
00:13:59,047 --> 00:14:01,627
थांब, ती ऐकणार कशावर?

258
00:14:01,800 --> 00:14:05,010
-ती कशावर ऐकेल याकडे मी कशाला लक्ष देऊ?
-काय हे, लाऊडरमिल्क.

259
00:14:05,178 --> 00:14:07,008
काय हे, सगळ काम अर्धवट ठेवायचं.

260
00:14:07,180 --> 00:14:11,140
मला म्हणायचंय कधीतरी काहीतरी तर
पूर्ण कर-- हा हे घे. बरोबर.

261
00:14:11,309 --> 00:14:12,849
नेहमीप्रमाणे बेन वाचवायला आला.

262
00:14:13,019 --> 00:14:15,899
-स्वस्त. केवळ ६० रुपये.
-ठीक.

263
00:14:16,064 --> 00:14:18,114
-अजून एक उपकार.
-नाही, मी-- मी पुरता कंगाल झालोय.

264
00:14:18,275 --> 00:14:20,315
काहीही. तुझ्या खिशात हुंडो आहे.

265
00:14:20,485 --> 00:14:22,565
जेव्हा मी तुझ्या पटलोणचे खिसे तपासत
होतो तेव्हा दिसल.

266
00:14:22,737 --> 00:14:27,157
-तू माझे खिसे का तपासत होता?
-तू "मी कंगाल" झालोय बोलू नये म्हणून.

267
00:14:27,325 --> 00:14:29,945
-तुला सांगू, तू खरच नीच आहेस.
-हो.

268
00:14:37,627 --> 00:14:39,087
-हे, अॅलिसन.
-हे.

269
00:14:39,254 --> 00:14:40,714
हे, सॅम.

270
00:14:41,298 --> 00:14:43,928
-आठवतय? मी तो--?
-हो, हो. मला-- मला आठवतय.

271
00:14:44,092 --> 00:14:47,682
ऐक, काल, मी फारसा चांगला प्रभाव
पाडू शकलो नाही.

272
00:14:49,347 --> 00:14:52,847
आणि गोष्ट अशी आहे, मी व्यसनी
आणि दारुड्या लोकांचा सल्लागार आहे.

273
00:14:53,018 --> 00:14:57,228
तर मी-- मी अशा लोकांसोबत बोलत
असतो जे दिवसभर खोट बोलत असतात.

274
00:14:57,397 --> 00:15:00,527
आणि तुम्हाला, कधीकधी-- कसं सांगु,
थोडं फटकळ असावं लागत.

275
00:15:00,692 --> 00:15:03,862
तुम्हाला ते सांगत असलेल्या बाजरगप्पातून
सत्य शोधायला थोडं कर्कश असाव लागतं.

276
00:15:04,070 --> 00:15:08,200
पण मला लक्षात आलंय ते थोडं माझ्या
वैयक्तिक आयुष्यात ही उतरलंय.

277
00:15:08,366 --> 00:15:10,366
-तर--
-तर ते अतिशय कठीण असणार आहे.

278
00:15:10,577 --> 00:15:12,447
अर्थात उद्धट होण्यासाठी ही
पळवाट नाहीये.

279
00:15:12,621 --> 00:15:14,621
तर मला इतकच म्हणायचंय--

280
00:15:15,373 --> 00:15:19,003
हा, मला तुला हे द्यायचं होतं. आठवत,
तू म्हटली होतीस तू गिटार शिकतेय.

281
00:15:19,169 --> 00:15:21,249
आणि हा आंद्रे सेगोविआ आहे.

282
00:15:21,421 --> 00:15:23,761
हा गिटारवादकांचा हेंड्रिक्स आहे.

283
00:15:23,965 --> 00:15:25,175
-तो जबरदस्त आहे.
-बरोबर.

284
00:15:25,383 --> 00:15:27,553
तुला तो आवडेल. बस त्याच्यात
एकच कमतरता आहे...

285
00:15:27,719 --> 00:15:30,219
...तो नशापाणी करत नाही, त्यामुळे तो
कोण हे कोणाला ठाऊक नाही, पण--

286
00:15:30,388 --> 00:15:31,468
हां.

287
00:15:31,681 --> 00:15:33,561
हां, सॅम, हे खरच फार छान आहे.

288
00:15:33,725 --> 00:15:36,555
-पण माझ्याकडे चुकते करायला पैसे नाहीत.
-ओह, हा, हे, तुझ्याकडे आहेत.

289
00:15:36,728 --> 00:15:37,938
मी हे घेतल--

290
00:15:38,104 --> 00:15:39,774
हे याच्यासोबत--

291
00:15:40,774 --> 00:15:42,114
म्हणजे बघ--

292
00:15:43,193 --> 00:15:45,203
-अरे, आभारी आहे.
-कडी.

293
00:15:45,362 --> 00:15:47,662
-हो, का नाही. हा ही घे.
-तर तू इथे आहेस.

294
00:15:48,740 --> 00:15:50,280
तू कचऱ्याचा डोंगर.

295
00:15:50,450 --> 00:15:52,450
मी तुझ्याकडे मदत मागायला आले,
आणि तू काही केल नाहीस.

296
00:15:52,619 --> 00:15:54,329
नाही, खरतर, तू सगळ फार कठीण केलस.

297
00:15:56,206 --> 00:15:58,916
हे असं होतं कधीकधी ज्याच्याविषयी
मी सांगत होतो.

298
00:15:59,084 --> 00:16:01,714
-मला वाटत ती बाथ सॉल्ट घेतेय--
-तू तिच्याशी खोटं बोलू नकोस.

299
00:16:01,878 --> 00:16:04,708
तू माझ्या पोरीला आळशी म्हटलं, आणि
मग तिच्यापुढे प्रस्ताव ठेवला.

300
00:16:04,923 --> 00:16:08,433
नाही, नाही, नाही. हे, मी तिला इतकच
म्हटलं मी तिच्यासोबत झोपणार नाही.

301
00:16:08,593 --> 00:16:10,683
मग तू तिच्या स्वच्छतेचा अपमान केलास?

302
00:16:12,681 --> 00:16:17,271
हो. हे खरय ना, त्या पोरीला
सडक्या प्रेतासा वास मारत होता. नाही?

303
00:16:18,186 --> 00:16:20,106
तू पाद्री माईकलला फसवलं असशील...

304
00:16:20,271 --> 00:16:23,691
...पण मला दिसतय तू एक निरुपयोगी
मनुष्य आहे.

305
00:16:23,858 --> 00:16:25,688
तुझा मला तिटकारा येतोय.

306
00:16:29,489 --> 00:16:33,539
तर सेगोविआ हा पहिला इसम होता ज्याने
गिटारवर नायलॉनची तार लावली.

307
00:16:33,702 --> 00:16:37,582
आणि त्यामुळे आवाज एकदम खुलला,
आणि त्यामुळे बोट फिरवण--

308
00:16:37,872 --> 00:16:39,122
मज्जा कर.

309
00:16:40,458 --> 00:16:42,788
हे, पहा जरा.

310
00:16:43,002 --> 00:16:44,802
आपली इथून तुझ्यामुळे हकालपट्टी झाली.

311
00:16:46,589 --> 00:16:48,299
आजची बैठक रद्द करण्यात आलीये.

312
00:16:50,301 --> 00:16:51,301
अविश्वसनीय.

313
00:16:51,469 --> 00:16:53,299
ही पूर्णपणे सॅम लाऊडरमिल्कची चूक आहे.

314
00:16:53,471 --> 00:16:56,641
म्हणजे, कुठला सैतान तुम्हाला कॉमिक
सॅन्स वापरून बाहेर काढतो?

315
00:16:59,978 --> 00:17:01,018
चल, माईक.

316
00:17:01,187 --> 00:17:03,727
-तू आम्हाला असं बाहेर काढू शकत नाही.
-मी आताच केलंय.

317
00:17:03,898 --> 00:17:05,978
ज्या लोकांना मदत हवीये त्यांच काय?

318
00:17:06,151 --> 00:17:07,651
हा, ते तुझ्यावर आहे, लाऊडरमिल्क.

319
00:17:07,819 --> 00:17:10,859
मी आधीच स्पष्ट केलं होतं तू तुझं काम
केलं नाही तर काय होऊ शकत.

320
00:17:11,030 --> 00:17:13,030
माझं तुझ्यासारखं नाही, मी शब्दाला जागतो.

321
00:17:13,199 --> 00:17:16,909
हो, मी काही तुझ्या त्या आवडत्या
दाढीवाल्याबुआ सारखा चमत्कारी पुरुष नाहीये.

322
00:17:17,579 --> 00:17:18,709
तू येशू म्हणतोय?

323
00:17:19,372 --> 00:17:22,542
-तू पोरीशी बोलायला सांगितल, बोललो.
-तू अजून प्रयत्न करायचे होते.

324
00:17:22,709 --> 00:17:25,089
मी बरेच प्रयत्न केले.
ती ऐकायला तयार नाहीये.

325
00:17:25,628 --> 00:17:27,168
माझा निर्णय पक्का आहे.

326
00:17:27,338 --> 00:17:28,838
तू हे स्वत:वर आणलय.

327
00:17:29,340 --> 00:17:31,930
-तर मग इतकच?
-होय, इतकच.

328
00:17:32,635 --> 00:17:35,005
ठीक. तुला सांगु मला तुझी गरज नाहीये.

329
00:17:35,221 --> 00:17:40,191
मला अश्या अनेक जागा माहितीयेत ज्या
गरजू लोकांसाठी आपले दरवाजे उघडे करतील.

330
00:17:40,935 --> 00:17:43,725
मी अफूसाठी पैसा हवा म्हणून काही पुरुषांचा
हलवायला लागलो.

331
00:17:43,897 --> 00:17:45,357
मोठी गोष्ट नाहीये ही.

332
00:17:45,523 --> 00:17:48,493
काही कळायच्या आधी,
मी मुखमैथुन करत होतो.

333
00:17:48,651 --> 00:17:53,071
असं वाटतय मी तोंडात लिंग न घेता
पांच मिनिटे ही राहू शकत नव्हतो.

334
00:17:53,239 --> 00:17:55,279
मग मी कोसळलो.

335
00:17:55,450 --> 00:17:57,740
आणि एक दिवस, मी कारागृहात होतो...

336
00:17:57,911 --> 00:17:59,831
...कोणातरी सोबत भांडत ज्याला सगळं
कळत होतं अशासोबत...

337
00:17:59,996 --> 00:18:04,376
...मजा कशात आंडाशी खेळताना लिंगाच्या तोंडाशी
राहाण की सगळा आत घेणं.

338
00:18:06,336 --> 00:18:07,626
ते--

339
00:18:08,463 --> 00:18:10,473
तो मी नाहीये.

340
00:18:12,008 --> 00:18:13,838
ठिक. ठिक, चांगलं सांगितलं.

341
00:18:14,010 --> 00:18:16,140
फारच जबरदस्त होतं.

342
00:18:17,764 --> 00:18:19,854
ही फार भयंकर, भयंकर कल्पना होती.

343
00:18:21,559 --> 00:18:22,889
आणि ती माझी होती.

344
00:18:23,061 --> 00:18:25,901
आपण चर्चमध्ये परत जायला हवं,
पण मला मार्ग शोधायला हवा.

345
00:18:26,064 --> 00:18:29,614
तुम्ही लोकं त्याची काळजी करू नका.
तुम्ही माझा प्राधान्यक्रम आहात.

346
00:18:29,776 --> 00:18:30,776
चला तर.

347
00:18:30,944 --> 00:18:37,584
मी जीवशास्त्रज्ञ किंवा काही नाही, पण
सगळा आत घेण्यात मजा आहे, बरोबर?

348
00:18:37,826 --> 00:18:39,736
कारण तिथे सगळ्या नसा असतात.

349
00:18:39,911 --> 00:18:42,501
पण जर तुम्ही आंडाशी खेळात असाल तर
ती जबरदस्त चाल आहे.

350
00:18:42,664 --> 00:18:45,084
-विरोध मजा देतो.
-मित्रानो, चला जाऊ या.

351
00:18:51,673 --> 00:18:52,673
हे, फादर.

352
00:18:52,841 --> 00:18:55,391
ठीक आहे, तर मी त्या जागेच्या
बाहेर होतो...

353
00:18:55,593 --> 00:18:57,683
...जिच नाव "कॉकब्लॉकर्ज" आहे.
बरी आहे जागा?

354
00:18:57,846 --> 00:19:00,596
एखाद्या स्ट्रीप क्लब साठी याहून वाईट
नाव याच्या डोक्यात नाही आलं.

355
00:19:00,765 --> 00:19:03,345
हा, मला वाटत त्यांना विपणन समजत नाही.

356
00:19:03,518 --> 00:19:07,108
तर जर मी क्लेअरशी, बोललो तर तू
आम्हाला चर्चमध्ये येवू देशील, बरोबर?

357
00:19:07,272 --> 00:19:09,482
-मी माझ्या शब्दाला जागतो, लाऊडरमिल्क.
-ठीक आहे.

358
00:19:09,649 --> 00:19:13,649
मी पांच वर्षे झाली बारमध्ये पाय ठेवला नव्हता,
आलो आता गप्प झोप.

359
00:19:16,155 --> 00:19:18,445
ठिक आहे, चला हे आपण पोरांसाठी करुया.

360
00:19:30,253 --> 00:19:34,093
ओह, हे वाईट आहे, वाईट आहे,
वाईट आहे.

361
00:19:35,758 --> 00:19:37,138
याहून बिभत्स राहू शकलं असतं.

362
00:19:39,596 --> 00:19:43,136
-मी तुझ्यासाठी दारू आणू का?
-नाही. नाही, नाही, नाही.

363
00:19:48,897 --> 00:19:50,107
ती पहा ती तिथे आहे.

364
00:19:51,900 --> 00:19:54,070
हे, क्लेअर.

365
00:19:54,611 --> 00:19:56,911
-हाय.
-तू आहेस.

366
00:19:57,113 --> 00:20:00,583
-माझ्याघरी आलेला गाढव.
-तू गोड आहेस, आठवत.

367
00:20:00,742 --> 00:20:02,912
मी थोड्यावेळात इथे तुझा चोथा करेन.

368
00:20:03,077 --> 00:20:06,787
मी माझ्या आईला सांगितलं तू मला काय
म्हटलास, आणि ती भलतीच रागावली.

369
00:20:06,956 --> 00:20:10,916
हां, ठाऊक आहे. तुझी इच्छा होती मला
त्रास व्हावा, तो झाला.

370
00:20:11,419 --> 00:20:12,669
तुला हकलून देण्यात आलं.

371
00:20:14,005 --> 00:20:15,965
-हे. हात लावायचा नाय.
-ठीक आहे, चालतं.

372
00:20:16,174 --> 00:20:17,594
नाही, मी कोणालाही स्पर्श करत नाहीये.

373
00:20:17,759 --> 00:20:18,839
ती मला स्पर्श करतेय.

374
00:20:19,010 --> 00:20:21,220
ठिक आहे. मी त्याला ओळखते.

375
00:20:21,387 --> 00:20:24,517
-हे शॅपेन कक्षात जाऊन करा.
-होय, आम्ही जातोय. आभारी आहे.

376
00:20:31,356 --> 00:20:33,606
इथे. तुला थोडं मोकळ्या हवेत
जायला हवं. चल.

377
00:20:41,699 --> 00:20:46,249
तर ही सगळी चमकधमक आणि
मजा वाटत असली...

378
00:20:46,412 --> 00:20:49,042
...मी हे सगळ पाहिलंय, आणि याचा
शेवट चांगला होतं नाही.

379
00:20:49,248 --> 00:20:51,498
तुला काही माहिती नाही.

380
00:20:51,668 --> 00:20:54,798
मला जोड्यावर न उडवता ओकारी
करता येते.

381
00:21:03,096 --> 00:21:04,306
इथे.

382
00:21:06,140 --> 00:21:09,560
बस खुप जास्त ओकु नकोस
म्हणजे मिळवली.

383
00:21:11,896 --> 00:21:13,556
तुला माझी इतकी काळजी का आहे?

384
00:21:14,315 --> 00:21:15,605
मी मदत करायचा प्रयत्न करतोय.

385
00:21:15,775 --> 00:21:16,815
तू मला मदत करू शकत नाही.

386
00:21:17,694 --> 00:21:19,284
कोणीच नाही.

387
00:21:19,529 --> 00:21:21,069
सांभाळ स्वत:ला.

388
00:21:21,239 --> 00:21:22,319
खरच, काय हे.

389
00:21:22,490 --> 00:21:28,000
जगात तू एकटीच आहे--?
मला दु:ख, वेदना होतं नसतील?

390
00:21:28,162 --> 00:21:29,582
माझ्या लग्नाला आठ वर्षे झाली होती.

391
00:21:29,747 --> 00:21:31,207
आणि मग काय झालं?

392
00:21:31,374 --> 00:21:32,924
ती तुला सोडून गेली?

393
00:21:33,084 --> 00:21:35,214
केवढ आश्चर्य.

394
00:21:35,461 --> 00:21:37,461
नाही, तसच काही नाही.

395
00:21:37,630 --> 00:21:41,470
आम्ही दोघे एका रात्री जॅक पिऊन
फिरायला निघालो...

396
00:21:41,634 --> 00:21:43,554
...आणि झाडावर जाऊन आदळलो.

397
00:21:46,347 --> 00:21:47,927
नाही, मी ठिक होतो.

398
00:21:48,683 --> 00:21:50,273
ती नव्हती.,

399
00:21:51,978 --> 00:21:53,438
दुर्घटना होतात.

400
00:21:53,604 --> 00:21:55,024
तुम्ही काय करू शकता?

401
00:21:55,940 --> 00:21:58,530
स्वत:ला त्रास देण सोप्प असतं...

402
00:21:59,027 --> 00:22:00,487
...पण जगण कठीण.

403
00:22:01,821 --> 00:22:04,741
तर क्लेअर, काय होतय तुला?

404
00:22:04,949 --> 00:22:08,369
ठिक, अशी कुठली समस्या जिथे
तुला कोणी मदत करू शकत नाही?

405
00:22:10,079 --> 00:22:13,209
बोल, मला अस मध्येच लटकवुन ठेवु
नकोस. मला रात्री झोप येणार नाही.

406
00:22:13,374 --> 00:22:14,384
बस-- बोलून टाक एकदाच.

407
00:22:15,793 --> 00:22:16,793
कशाचा त्रास होतोय तुला?

408
00:22:19,922 --> 00:22:21,422
मला--

409
00:22:21,883 --> 00:22:24,763
मला माझ्या वडिलांची आठवण येते.

410
00:22:28,556 --> 00:22:30,136
मला ठाऊक आहे.

411
00:22:31,642 --> 00:22:32,982
मला ठाऊक आहे, तुला येते.

412
00:22:34,562 --> 00:22:37,572
-हे, भावा, माझ्या प्रेयसीपासून दूर हो.
-ऐका, मित्रानो, मित्रानो, मित्रानो.

413
00:22:37,732 --> 00:22:39,572
ती दु:खी आहे, ठीक आहे?

414
00:22:39,734 --> 00:22:41,114
मी नुकतच एक सुंदर भाषण केलंय.

415
00:22:41,277 --> 00:22:42,987
मला सांगा तुम्ही त्यातला
काही भाग ऐकलात.

416
00:22:43,154 --> 00:22:46,494
नाही, भावा. आम्ही नाही ऐकला. पुन्हा
बोल शेक्सपिअरची औलाद. बोल ना.

417
00:22:46,783 --> 00:22:48,033
ठीक आहे. हे अस आहे.

418
00:22:49,994 --> 00:22:53,714
हे, मी या पोरीला रात्रभर शोधतोय...

419
00:22:53,873 --> 00:22:56,633
...कारण ज्या लोकांना खरच अडचणी
आहेत त्यांना मदत करू शकेन. ठीक?

420
00:22:56,793 --> 00:23:01,053
तुम्ही रस्त्यातून बाजूला होताय, की
वेगळी पध्दत वापरायची.

421
00:23:03,424 --> 00:23:05,134
तर तुला कसं कळल मला फोन
करायचा म्हणून?

422
00:23:05,301 --> 00:23:07,221
याच्या फोन मध्ये केवळ तीन क्रमांक होते.

423
00:23:07,428 --> 00:23:09,218
केवळ तू एकटा आहेस ज्याने फोन उचलला.

424
00:23:09,388 --> 00:23:11,518
हा, हे खरच, फार फार दयनीय आहे.

425
00:23:16,187 --> 00:23:18,817
-अरे, देवा रे.
-बिभत्स. मी निघते.

426
00:23:19,023 --> 00:23:20,073
तो-- ? तो ठिक आहेना?

427
00:23:20,233 --> 00:23:21,403
ओह, कोण, "डुक्कर" सॅम?

428
00:23:21,567 --> 00:23:23,147
नाही, तो ठिक आहे.

429
00:23:23,319 --> 00:23:25,949
हे, मी "सहृदय" बेन, बर का.

430
00:23:26,114 --> 00:23:27,124
हे.

431
00:23:27,323 --> 00:23:29,243
तू बार मध्ये करत काय होतास?

432
00:23:29,408 --> 00:23:31,238
ठिक, तू दारुडा. मी दारुडा.

433
00:23:31,410 --> 00:23:34,870
-आपल्या सारखे लोक हे नाही करू शकत.
-मला त्या पोरीला शोधायचं होतं.

434
00:23:35,039 --> 00:23:37,459
-सगळ ठिक होतं.
-हो, ते दिसतच आहे सगळ ठिक होतं.

435
00:23:37,625 --> 00:23:40,995
पुढच्या वेळी आधी मला फोन करायचा, मित्रा.
एकट नाही करायचं.

436
00:23:43,256 --> 00:23:45,416
खरच? त्यांनी तुझ्या पायाला
मारहाण केली?

437
00:23:46,467 --> 00:23:48,007
याने सूज उतरायला मदत होईल.

438
00:23:48,761 --> 00:23:50,301
धन्यवाद.

439
00:23:51,848 --> 00:23:55,058
हे, ज्या किशोरवयीन पोरीसोबत
मी इथे आलो...

440
00:23:55,268 --> 00:23:57,228
...माझा तिचा काही संबंध नाही,
लक्षात येतय?

441
00:23:57,979 --> 00:24:01,569
-हो, बेन नी मला ते सांगितलं.
-ठिक आहे. धन्यवाद.

442
00:24:03,901 --> 00:24:07,241
आपल्यात आधी जे काही झालं
ते विसरून जाण...

443
00:24:07,613 --> 00:24:08,873
...आणि नव्यान सुरुवात करण
तुला शक्य होईल का?

444
00:24:09,031 --> 00:24:11,661
तू म्हाताऱ्या लोकांना पायऱ्यावरून
ढकलण थांबवशील?

445
00:24:12,618 --> 00:24:14,448
मी कुठलही वचन देत नाही.

446
00:24:18,166 --> 00:24:20,746
ठिक. मला जायला हवं, सॅम.

447
00:24:21,169 --> 00:24:23,589
तुम्हाला काही हवं असेल तर
मला आवाज द्या.

448
00:24:24,005 --> 00:24:25,625
धन्यवाद.

449
00:24:28,467 --> 00:24:29,467
आलं माझ्या लक्षात.

450
00:24:29,635 --> 00:24:32,845
तू टंच शेजारणीची सहानुभूती मिळावी
म्हणून लढाईत हारलास ना.

451
00:24:33,598 --> 00:24:35,058
तुझ्याकडे जबरी रणनीती आहे.

452
00:24:35,224 --> 00:24:36,734
ऐक, मी माझे डोळे मिटतोय.

453
00:24:36,893 --> 00:24:42,323
जर मी मेलो, तर नेटफ्लिक्सचा शब्द आहे
"डायना खालची रेघ विएस्ट शून्य रेघ ३."

454
00:24:43,399 --> 00:24:44,819
हा, मला वाटत नाही तू मरशील...

455
00:24:44,984 --> 00:24:47,574
-...कारण हे वाईट शेवटचे शब्द आहेत.
-हो.

456
00:24:55,453 --> 00:24:56,583
तू कमवलस.

457
00:24:56,787 --> 00:24:58,917
बैठकीची जागा की मार?

458
00:25:11,219 --> 00:25:13,139
ओह, छान.

459
00:25:13,304 --> 00:25:16,354
जा आत, आणि खुर्च्या लावा.
मी आलोच.

460
00:25:16,515 --> 00:25:18,675
-मी तुला काही विचारू का?
-काय?

461
00:25:19,310 --> 00:25:21,480
-ते दु:खतय का?
-हो.

462
00:25:21,646 --> 00:25:22,936
छान.

463
00:25:24,232 --> 00:25:27,782
तू मला जिथे मी लाट्टे पितो तिथे माझ्या
मुखमैथुनाविषयी बोलायला सांगितलं.

464
00:25:28,694 --> 00:25:30,154
तू कोण आहेस?

465
00:25:30,488 --> 00:25:31,948
जाऊ देत.

466
00:25:32,365 --> 00:25:35,365
लाऊडरमिल्क, तुला भेटायला
कोणीतरी आलय.

467
00:25:44,126 --> 00:25:45,416
मी--

468
00:25:45,586 --> 00:25:48,006
मला तुला हे वापस द्यायचं होतं.

469
00:25:48,464 --> 00:25:51,384
-मी हे धुतलय.
-तुला हे करायची गरज नव्हती.

470
00:25:51,550 --> 00:25:52,970
मी यावर ओकले होते.

471
00:25:54,553 --> 00:25:56,563
माझी इच्छा आहे तू खरच ठेवाव.

472
00:26:01,477 --> 00:26:02,557
तू...

473
00:26:03,187 --> 00:26:05,647
...बरोबर होतास, खर सांगायचं तर.

474
00:26:06,691 --> 00:26:07,981
स्वत:ला इजा करून घेण सोप असतं...

475
00:26:10,361 --> 00:26:13,411
...पण जगण अतिशय कठीण.

476
00:26:15,283 --> 00:26:18,493
हां, अगदी आंधळी खार ही दिवसातुन
दोनदा बरोबर असतेच.

477
00:26:19,203 --> 00:26:23,293
तर, तू इथे आहेस, तू बैठकीला
उपस्थित राहणार आहेस?

478
00:26:23,624 --> 00:26:25,464
हा, मी--

479
00:26:25,751 --> 00:26:26,881
आज रात्री मला शक्य नाही.

480
00:26:27,044 --> 00:26:28,634
-नाही?
-पण कदाचित पुन्हा कधीतरी.

481
00:26:29,922 --> 00:26:31,632
पुढच्या आठवड्यात कसं राहील?

482
00:26:33,175 --> 00:26:35,635
-कदाचित.
-हां, ठिक.

483
00:26:35,803 --> 00:26:37,853
पुन्हा भेटू, कदाचित.

484
00:26:40,891 --> 00:26:43,521
बरोबर, मुखमैथुन करणाऱ्या इसमा.

485
00:26:55,614 --> 00:26:56,824
हाय.

486
00:26:56,991 --> 00:26:59,991
हे, सॅम आहे का, की--?

487
00:27:00,161 --> 00:27:03,961
ओह, नाही. तो अजूनही चर्च मध्ये
त्याची बैठक घेतोय,

488
00:27:04,123 --> 00:27:05,423
जिथे तो घेत असतो.

489
00:27:05,583 --> 00:27:08,793
मी तुला आत बोलावलं असतं पण मी
नुकताच आंघोळकरून बाहेर आलोय

490
00:27:08,961 --> 00:27:10,461
म्हणजे--? कपड्यात ना?

491
00:27:11,088 --> 00:27:13,168
ओके, आल्या बद्दल धन्यवाद.
मी त्याला सांगेन.

492
00:28:10,689 --> 00:28:12,689
भाषांतरकार :
सारंग भाकरे

